तु घे क्षणभर विश्रांती पावसा
तु घे क्षणभर विश्रांती पावसा
तुझ्या बरसण्याने सुखावले सारे
क्षणिक का होईना आनंदले सारे
दाटले काळोख्या रात्री चे भासे आभाळ
आले घोंगावत जसे भिरभिरत वादळ । ।1।।
धो धो बरसती पावसाच्या सरी
जाहला जिकडे तिकडे जल प्रलय
सावरण्यास दे जना काही सा अवधी
तु घे क्षणभर विश्रांती पावसा ।।2।।
धो धो बरसण्याने तुझ्या
तुटले धरण णि पडल्या भिंती
जिव हा झाला घाबरा घुबरा
तु घे क्षणभर रे पावसा विश्रांती ।।3।।
