टिका
टिका
मोठया हॉटेल चे होते उदघाटन,
सारेचं होते आलीशान ,
टाईल्स होत्या छान ,
पण एक टाईल लावायची गेली राहून ,
भिंतीवर होते रंग व डिझाईन छान,
पण पडले होते काळे डाग दोन,
पाहुण्यांचे होत होते स्वागत छान,
मालकांनी ठेवली होती वही एक,
पाहुण्यांना सांगितले लिहा मत मनापासून,
छान गोष्टी कडे लक्ष गेले नव्हतेच कुणाचे
लिहिते झाले सर्व राहिलेल्या टाईल्स बद्दल
आणि डागांनी कशी गेली भिंती ची शान,
तात्पर्य काय, सर्वांना दोषचं आधी दिसतात
त्यामुळे टिकेकडे लक्ष न देता आपण आपले काम करित राहवे