शाळा
शाळा
1 min
91
आठवते मला ती खाकी पँट आणि खाकी दप्तर,
शाळेच्या मैदानातील पिंडरीशेकवाले सासने मास्तर,
पहिल्या बेंचवरील हुशार पोरं आणि शेजारच्या बाकावरील फ्रॉकवाली पोर,
गणिताशी नव्हते सख्य फार,
काळपट पानांच्या वहिवर कुणाचे छान तर कुणाचे दिव्य अक्षर,
फीचा नव्हता भार पण अभ्यासाचा होता जोर,
बी.जीं चा इतिहास , लोकापुरेंचे इंग्रजी आवडीचे
नव्हते टिफीनचे मेनू, होता पोळीभाजीचाच आधार, शाळा सुटल्यावर इंग्रजीचे पाठांतर
चालत बोलतचं कापायचो घरापर्यंतचे अंतर
