नाती
नाती
बोला कधी तरी हसून
टाळायचे पण हसून
प्रश्नांमधे नका राहू अडकून
घ्या निर्णय वेळेवर समजून
कोणी हसले तर हसा मिळुन
उद्या नसेल कदाचित घेणारा समजून
ईच्छाना नका टाकून दाबुन
कांहीं वेळा घ्याव लागते समजून
नात्यांमध्ये जायचे असेल जर रंगुन
तोडणं असेल जरी सोपं चटकन
जोडण्यात आहे आनंद निधान
रुसण्याचा हक्क तेव्हाच असतो,
जेव्हा रीझवाल हसवुन,
स्वजनांच्या डोळ्यातील अश्रू पुसुन
नात्यांमध्ये नसतो मान अपमान, g
राहा प्रियजनांच्या हृदयात जागा मिळवून
