ठोंबरा
ठोंबरा
ठोंबरा ठोंबरा ,उबंरा उबंरा
ठोंबरा देवाची -आन,
ठोंबरा घरोघरी मागितलं।।धृ।।
दोन हाती दोन बैल
हैबती गैबती डोल
साजरी गोजरी झुल
तानुल्याला सजविलं ।।१।।
माझा तानुला लाडुला
खांदा मळन पोळ्याला
रंगविलं बाशिंगाला
मडगुलं सजविलं।।२।।
बैला इवले शिंगोटे
वर घातले पागोटे
वर दोन दोन गोंडे
तानुल्याला भुषविलं।।३।।
पायी पैंजन ते चाळ
घुंघराची होती माळ
आणली नवीन वाळ
भातुकलं निजवलं।।४।।
बैलपोळा आनंदाचा
खरा खुरा तानुल्याचा
भरजरी कपड्याचा
ठेवा देवा मागितलं।।५।।
