STORYMIRROR

Kiran Ghatge

Tragedy

3  

Kiran Ghatge

Tragedy

टाहो

टाहो

1 min
11.6K

भ्रष्ट विकासकामं योजनांची सरपनं रचलीस.

दुष्काळाच्या अग्निकुंडत माझी आहुती दिलीस.

संसाराचा माझ्या विसकुटा केलास.

पुन्हा माझ्या दारात हात जोडून आलास.


सावकाराच्या कर्जाखाली माझं भविष्य गाडलस.

कारखानाच्या तोडीनं माझं वर्तमान जाळलस.

ओरबाडून मला भूतकाळ झालास.

पुन्हा माझ्या दारात हात जोडून आलास.


खोल झालेल्या जखमांना चारा छावणीच मलम लावलंस.

त्याच्या दावणीला बायकापोरासकट बांधलस.

नसलेल्या जनावरांचा चारापण खाल्लास.

पुन्हा माझ्या दारात हात जोडून आलास.


मोठं मोठ्या सभांमध्ये रणशिंगे फुंकलीस.

वेदनांची माझ्या भांडवल केलीस.

सत्तेच्या माजमस्तीत मला मारत राहिलास.

अन पुन्हा माझ्या दारात हात जोडून आलास.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy