STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Others

4  

Rohit Khamkar

Abstract Others

त्रास

त्रास

1 min
266

ओझ कसलेही असो, जबाबदारी किंवा वजनात.

कधी कधी खूप त्रास होतो, आयुष्याच्या या शासनात.


गोष्ट मनासारखी होत नाही, झाली तर ती पटत नाही.

शापित जीवना मध्ये, एकटेपणा सोडून उरलय का काही.



उरलेली ती आहे फक्त बाकी, आयुष्याच्या वजा बेरजेतून.

विस्कटलेल्या या प्रयत्नांना, आत्मविश्वास आणायचा कुठून.



आणला कुठून उधार, तरी तो धार्जीण होईलच का?

सारखे पडण्याच्या भीतीपुढे, पुन्हा उठून पळशील का?



पाळायला तर लागलो खरा, पहिल्या श्वासाच्या शर्यतीपासून.

अंत सगळ्यांचा सारखाच होईल, शेवटच्या त्या म्रुत्युपासून.



मरतानाच काय तो एकदाचा, शेवटचा त्रास होईल.

अंत्ययात्रेला माझ्या गोडवे गाणाऱ्याना सुध्दा, थोडीशी झळ देऊन जाईल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract