Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

तों पाऊस

तों पाऊस

1 min
257


आठवता पुन्हा । थरकाप होतो । 

उभा तों राहतो । तों पाऊस ॥ १॥


एकटाच होतो । जीर्ण झोपडीत । 

तेव्हा पडवीत । झोपलेलो ॥ २॥


किर्रर्र होती रात्र । गडगडे नभी। 

सौदामिनी उभी । चमकत ॥३॥


मनसोक्त तेव्हा । कोसळले मेघ । 

काळजात रेघ । काळजीची ॥ ४॥


अश्या त्या रात्रीच्या । पावसाची ओल । 

पोहचली खोल । काळजात ॥५॥


वाहूनिया गेले । रात्री माझे गाव । 

राहिले ते नाव । मात्र मागे ॥ ६॥


असा तों पाऊस । विसरू मी कसा । 

तों राक्षस जसा । अवकाळी ॥ ७॥


येऊ नये कधी । पाऊस तों पुन्हा । 

वाहू नये पुन्हा । झोपडी ती ॥ ८॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy