तमाशा
तमाशा
सागराची सवारी करण्यां , निघाले होते मी जोमातं
पोहण्यासं मज येत नसे, बांधून स्वतःस बसले नावेतं
किती हास्य ते किती खुशी, क्षणात नष्ट होऊनी गेले
तमाशा झाला जीवनाचा, बांधलेले धागे दोरे विरले
साक्ष खोटी घेऊन नाविकाने, किनाऱ्यावर मज नेवून सोडले
परतु कशी मी सागरातुनी ह्या, लाटानीं मज तिथेच रोखले
वाटले कधी नां असे मनां , विपरीत काही असे घडले
आसवांचा कुणा पूर दिसेनां, जीवन माझे सागरात डुबले
लढाई दिसेनां सागरातील ही, नाविक सोबतीतं कधीच नां राहिलां
बघून मज साधी एकटीलां , विषारी माशांनी प्रहार केलां
उशःकाल होऊन अंधार झालां , वाट बघता नाविकाची किनारा सुटलां
खोलवर बुडालें सागरात ह्यां , हसतं खेळतं तमाशा झालां
