तलवारीची धार
तलवारीची धार
तलवारीची धार
'
पुष्पाग्रज. '
न झाला न होणार
असा साहित्यकार,
साहित्य माझ्या अण्णाचं
गाजतंय जगभर
अण्णा भाऊंच्या लेखणीला
आहे तलवारीची धार...
जे भोगलं, अनुभवलं
तेच त्यांनी लिहिलं,
वास्तव अण्णाचं लेखन
जगाला फार भावल,
दिला शोषीताना न्याय
केला अन्यायावर वार...
दुःख, दैन्य, दारिद्रय
जीने मन हेलावणारे,
सत्य साहित्यात मांडणारे
ठरले अण्णा भाऊ खरे
पेटविली मशालबहुजनांचा हुंकार...
कल्पनेच्या पंखांनी
नाही
घेतली भरारी,
जगात गाजली ती
अण्णा भाऊंची कादंबरी,
जगी आश्चर्य मोठं
न शिकता साहित्यकार...
अण्णा भाऊंनी दिला
जगाला फकिरा,
लकाकला जगी
हा साहित्य हिरा,
दिले बळ आम्हा
केला अनिष्ठतेवर प्रहार...
करून शाहिरी
केले समाजप्रबोधन,
खळवळे रक्त
पाहून शोषण
कष्टांवर तरली धरती
क्रांतिकारी हा विचार..
.
रशियात उभे
पुतळे अण्णा भाऊंचे,
जगभर अनुवादित
साहित्य त्यांचे,
चित्रपट गाजले
अण्णांच्या साहित्यावर...
गायकवाड आर.जी.
दापकेकर जि.नांदेड
9834298315
