तिरंग्याची शान
तिरंग्याची शान
साऱ्या भारत देशाची आन
जगात उंच तिरंग्याची शान...
देश माझा जन्मभूमी विरांची
सरदार भगतसिंग सावरकरांची
तिरंग्यावर कुर्बान माझी जान....
हसत तोडली गुलामीची बेडी
माझी आत्मा तिरंग्यासाठी वेडी
तीन रंगात विसरून जातो भान....
सैनिकांचा तिरंग्यात आहे जीव
केली ना कधी त्यांनी शत्रूंची कीव
सीमेवर भारत मातेचे गाई गुणगान....
रक्तात मिसळला भगवा रंग
शांतीचे प्रतीक बनला पांढरा रंग
हिरव्या रंगात जगण्याचे वरदान....
