ती...
ती...
ती
नजरेत स्वप्न जगणारी ,
मनात आभाळमाया जपणारी,
ती
प्रेमाची अंकुर रुजवणारी ,
दु:खात ही सुखाची बाग फुलवणारी
ती
कष्टाला कधी न थकणारी,
घामाच्या धारा ही पाऊससरी समजणारी
ती
उदात्ततेला एक आव्हानच
जगण्याची कला शिकवणारी
ती
हसून करते सारे साजरे
जे जे सहिले दु:ख आजन्म ते..
ती
एक नारी एक पत्नी ,एक आई
एक मुलगीच नाही तर देवी ही
तरीही मागते ती तिचीच ओळख
या दोग्ल्या समाजात..
होते नाराज मनी जगते ती
इतरांच्या जगात तिची खोटी प्रतिमा ती
सामान्य तरी असामान्य विभूती ..
एक स्त्री...👱♀️
