STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Inspirational

4  

Deepali Thete-Rao

Inspirational

ती....

ती....

1 min
364

 जन्म झाला, म्हणाले सगळे

 "बेटी तो धन की पेटी है।" 

 हृदयाशी कवटाळूनी मज जरा,

धरूनी छोट्याशा नाजूक हाताला, 

 अव्यक्त भाव वदल्या नजरा...


 उधळत रहा हर्ष 

हास्यातूनी असाच घरभर..

कूस उजू दे भावासाठी

 गे तुझ्या पाठीवर......


 उमगले न काही तेव्हा... 

 प्रेम आहे हे म्हणाले मजवर

 आणि...

 अजाण अपेक्षांचे ओझे, 

चढवत राहिले डोक्यावर... 


स्वतंत्र होते मी...त्यांच्या मते 

कुठेही विहरण्यासाठी 

 फक्त होती निवडायची जागा

आधीच सीमा राखलेल्या 

जागेतील एक.....


 करी नाव मोठे आमुचे

 घडवी भविष्य.. डॉक्टर..इंजिनिअर

मग गवसेल सहजची

तोलामोलाचा सुयोग्य वर .. 


हे घाल..ते कर...

सांगत गेले 

मी ऐकत गेले 

तिकडे नको ... इकडे जा

सांगत गेले

मी चालत गेले

नव्याने मांडलेल्या  

संसाराच्या खेळातल्या..... 


अधोरेखित वाटा

 वरवर सारवलेल्या

 ......धरला हात जेव्हा

 माझा उमलत्या कळीने 

 उर्मी जागली अंतर्मनी

 मी स्वतंत्र झाले....


कदाचित आतातरी

मी स्वतंत्र झाले....

 छोट्याश्या परीसाठी

 मी दिवस-रात्र झटले 

 सांगत राहीले 

चूक- बरोबर , योग्य-अयोग्य 

जे ऐकले होते कधी... 

पण ....


 ही हुरहूर कसली अंतरी 

का तुटते काही उरी

मी आळवित होते सुरांतुनी 

फिरूनी तीच विराणी

काळीज काळजी ही

मायेतून पाझरताना

देत होते लेकीला 

वारसाहक्काने.... 


  स्वातंत्र्य चौकटीतले...... 

 तुटताना आत..आत खोल..खोल

काहीतरी. ..दडलेले मुळाशी

 गुह्य अंतरीचे मम हे

 सल कधीचा जपलेला उराशी


आताशा ठरवते आहे..

घडवावी एक मुक्ता

बेफाम छेदण्या आव्हाना..

 घडवावी एक चपला

चमकुनी भेदण्या क्षितिजा

घडवावी एक सुनीता


अंतराळही व्यापणारी

एखादी प्रियस्नुषा, प्रियकांता

ठाव मनीचा घेणारी

चमकू द्यावा एखादा हिरा


संस्कारांच्या अदृश्य कोंदणी वेढलेला

जाऊ द्यावा उंच उंच असा झोका

मातेच्या स्निग्ध करांनी 

पडता तर सावरलेला..... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational