Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Bilgi

Inspirational

5.0  

Pratibha Bilgi

Inspirational

" ती "

" ती "

1 min
266



संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलून

भोवतालच्या परिस्थितिशी तडजोड स्वीकारून

सगळ्या गोष्टींचा विरोध पत्करून

तारेवरची कसरत करणारी " ती "


समाजातील दुय्यम स्थान नाकारत

शोषण , जाचाला वाचा फोडत

रूढी - परंपरांना मागे पाडत

धार्मिक कायद्यांविरुद्ध न घाबरता लडणारी " ती "


शिक्षणाशी आपलं नातं जोडून

माणसिकरित्या प्रबल होऊन

अभिव्यक्तीच स्वातंत्र्य मिळवून

समानतेसाठी अविरत झटणारी " ती " 


मतदानाचा अधिकार गाजवत

सामाजिक संस्थांना हातभार लावत

भोवतालच्या परिस्थितीत सुधारणा करत

अधिक जागरूक , क्वचित संवेदनशील होणारी " ती "


कौटुंबिक हिंसेला न जुमानता

सतीप्रथा , हुंडाप्रथेला बळी न पडता

बलात्कारासारख्या निर्घुण कृत्याचा विरोध करता

अन्यायाविरुद्ध नेहमीचं उभी राहणारी " ती "


चूल - मूलच्या संकल्पनेतून बाहेर पडत

अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत

खासगी अन् कामकाजी क्षेत्रांचा समतोल साधत

पुरूषी वर्चस्वाला झुगारून लावणारी " ती "


मानापमानाला न घाबरून

आलेल्या परिस्थितीशी तडजोड करून

प्रत्येक नात्याचा आदर ठेवून

प्रेम , वात्सल्य अन् ममता दर्शवणारी " ती "


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational