STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

4  

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

ती

ती

1 min
393

कधी झाडातून

कधी मनातून 

कधी भिजत 

कधी भिजवत

कधी हळवा स्पर्श 

कधी धसमुसळा स्पर्श 

कधी रंगलेला

कधी रंगवलेला

कधीकधी आडवळणांनी जाताना

कधी मुक्यान अवचित समोरच्याच

पारिजातकाशी तुझा मौनातला संवादी चेहरा

आठवून झालेली माझी घालमेल

मी अनुभवलीय आणि तुही

पण 

आता

अडखळू नकोस भांबावू नकोस 

नकोस शोधूस सावलीचा आसरा

वठलेली निप्पर्ण फांदी वाट पाहतेय

आसक्त डोळ्यांनी मौन श्वासांनी

त्या रेशमी स्पंदनासाठी...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract