ती
ती


ती अल्लड आणि निरागस,
सारं काही सांगून द्यायची...
तिच्या आवडीच्या साऱ्या वस्तू,
हक्काने ती मागून घ्यायची
ती सुबक आणि सावळी,
इवल्या इवल्या नयनांची...
सारी उजळणी मनात आहे
तिच्यासोबतच्या क्षणांची
आजही आठवे तिची प्रतिमा,
जी माझ्या डोळ्यात दिसायची...
तिची ती कुरळी बट,
ती लाजून मागे सारायची