STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

ती नसती तर

ती नसती तर

1 min
208

नका करू स्त्री चा अवमान,

तिच्या मुळे तर जग चालते,

तिच्या पोटी जन्माला आलात,

तीच तर पदराच्या छायेखाली जपते.


ती नसती तर तुम्ही नसता,

घरादाराची शोभा नसती,

तिच्या मुळे सगळं सुरळीत,

कारण ती खंबीरपणे जबाबदारी पेलती.


ती नसती तर तुमचे अस्तित्व नसते,

तिच्या विना घर सुनं सुनं भासते,

तिच्या असण्याने घराचं अंगण फुलते,

ती म्हणजे सगळ्यांना एकत्र ठेवणारा दुवा असते.

***************************


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational