ती कुणासाठी जगली
ती कुणासाठी जगली
आयुष्याच्या तळहातावर
संसाराची पोळी भाजली
भाजता भाजता एक दिस
हातालाच चटके बसली
संसार गाडा ओढता
कष्ट अपार झेलली
मोह मायेत अडकून
स्वतःलाचं विसरली
मानपान राखता राखता
कितीदा पायावर वाकली
उन्हे तान्हे सहन करता
काळजाला ठेस लागली
तुझं माझं करता करता
संसारासाठी धावली
उपाशी तापाशी राहून
तुमच्यासाठिचं जगली
दिवस रात्र करूनी
पोरं बाळं वाढवली
पानगळ झाल्यावर
पाखरेचं उडून गेली
