STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

ती कळ खोल रुजली

ती कळ खोल रुजली

1 min
209

काळोख दाटला का अंतरी

धुसर जाहल्या दिशा चारी

अनामिक हुरहुर का मनी

आभासिक सल रुजते उरी

उगीचच भास होतात उरी

आत खोलवर रुजतात दरी

काळजास घाव घालुनी

ममत्व का रुसले अंतरी

दुरावली मायेची सावली

पोरकी झाली छबी बिचारी

इवल्याशा पापणीत अश्रुनी

थैमान वादळी वसली काहुरी

सांग कशी थोपवू मनाला

कुठून खोट करु सत्याला

उगाचच भास हे होतात

कळा खोलवर रुजतात

आज राहुनी आसवे येतात

ना जाणे का दु:ख सलतात

भास ते खरे ही होतात

मनास दुःखाच्या दरीत लोटतात

आजची उषा ना भावली

कोणा अयुष्यात रात्र झाली

सल ती जाणली मी मनी

ती कळ खोलवर रुजली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy