ती आणि मी
ती आणि मी
काळाच्या सोबत ती पुढे पुढे जाते...
आधुनिकतेच्या लेण्यांनी सजलेली असते ....
अल्लड, अवखळ, हास्यानं वावरत असते ...
हास्यातून मला जरासं वेडावत असते ...
तिच्या या हास्याला नेमका कोणता प्रतीसाद द्यावा
या संभ्रमात मी ...
माझा जंगलीपणा आणि आदिमपणा कधी गळून पडणार या गहन विचारात मी ...
