तिच्याविना आयुष्य म्हणजे...
तिच्याविना आयुष्य म्हणजे...
तिच्याविना आयुष्य म्हणजे
रुक्ष पद्म जणू मग विरलेले
ओठावरच्या पाकळ्यांवरती
कोरडे अश्रू ते ओघळलेले
तिच्याविना आयुष्य म्हणजे
नकोसा झालेला श्वास शेवटचा
एक एक विनता धागे मग
गुंता त्यात खोट्या सांत्वनाचा
तिच्याविना आयुष्य म्हणजे
प्रश्न किती ते निरुत्तरीतच
ओंजळी राहता रिकामी अन्
मन पोखरता मग आतूनच
तिच्याविना आयुष्य म्हणजे
हात सुटला तो हातातला
घट्ट आवळता मग त्यातला
चाफा होता चिरमटलेला
तिच्याविना आयुष्य म्हणजे
कापरे बोल येई ओठांवरले
मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला
तिचं अस्तित्त्वात विणलेले