STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

तिची कहाणी

तिची कहाणी

1 min
228


।। तिची कहाणी ।।


चिंपाझीसह ती बोलत होती

तिची कहाणी सांगत होती


पूर्वीपासून मला ठेवले बांधून

घराबाहेर काही निघायचे नाही

फक्त चूल नि मूल सांभाळावे

बाहेरचे काम बघायचे नाही

जुन्या काळापासून आमची

होत आली बघा अशी माती

चिंपाझीसह ती बोलत होती

तिची कहाणी सांगत होती


जिच्या उदरातून जन्म घेतला

ती आई सुद्धा एक नारीच आहे

मग मुलगी नको म्हणून हा

गर्भ पाहून निर्णय घेतो आहे

लोकांची अशी गुंग झाली मती

चिंपाझीसह ती बोलत होती

तिची कहाणी सांगत होती


रक्षाबंधन सण येता जवळी 

बहीण पाहिजे राखी बांधण्यास

सुखात असती सर्व गणगोत

दुःखात कोणी नसतो रडण्यास

तरी मुलींचे गर्भ का पाडती

चिंपाझीसह ती बोलत होती

तिची कहाणी सांगत होती


संसार सुखाचा करण्यासाठी

सर्व नवऱ्याना पाहिजे बायको

मुलगाच पाहिजे या हट्टापायी

मुलीचा जन्म यांच्या घरात नको

लग्नाला मुली मिळतील किती ?

चिंपाझीसह ती बोलत होती

तिची कहाणी सांगत होती


आई पाहिजे, बहीण पाहिजे

परिवारात एक बायको पाहिजे

वंशाची वेल वाढविण्यासाठी 

कुटुंबात एक मुलगी पाहिजे

असे उपदेश अनेकजण सांगती

चिंपाझीसह ती बोलत होती

तिची कहाणी सांगत होती


वेळीच आवरा स्वतःच्या मनाला

मुलगी-मुलगी भेद मानू नका

मुलगा असेल वंशाचा दिवा 

म्हणून मुलीला दूर सुरू नका

यानिमित्ताने आठवण करून देती

चिंपाझीसह ती बोलत होती

तिची कहाणी सांगत होती. 


- नासा येवतीकर, धर्माबाद

9423625769



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational