STORYMIRROR

Manisha Wandhare

Inspirational

3  

Manisha Wandhare

Inspirational

तिचे ध्येय

तिचे ध्येय

1 min
151

नऊ वर्षाची सुकुमारी,

एका बिजवराने वरली ,

विक्षिप्तपणा त्याचा मोठा तरी ,

तोच ठरला स्त्री शिक्षणाचा वाली ,

त्याच्यामुळे देशाला पहिली डॉक्टर मिळाली...

बायकोला शिकवायच्या अटीवर ,

गोपाळाने वरली आनंदी,

धास्ती त्याची त्या मुली ,

भितीनेच अभ्यासाची ,

पहीली पायरी ठरली ...

सुख दुःख नाही संसाराचे,

कुठे संबध ना जपावे ,

येईल अभ्यासात व्यत्यय ,

म्हणून घरेची रहावे ,

शिक्षणासाठी तिने साऱ्या ,

इच्छेचा केला त्याग ,

वसा नवऱ्याचा सोबती ,

ज्योत पेटवून ज्ञानाची ,

बुद्धी उजाळून देती ...

पेरले गेले जे ज्ञानाचे बिजांकुर ,

कल्पवृक्ष त्याचा जाहला ,

नाही जागा स्वदेशी ,

वैद्यकिय ज्ञान घेण्या ,

जावे लागेल परदेशी ,

हे गोपाळाने हेरले ,

नाटक रचले ख्रिस्ती होण्याचे,

पण डाव फसले त्यांचे ,

ते पत्र जे पाठवले ,

ते वर्तमानपत्रात छापुन आले,

वृत्त वाचून एक भली स्त्रीने ,

पत्र आनंदीस पाठवले ,

शिकण्यासाठी परदेशी माझ्याकडे यावे,

विरोध पत्करून सर्वांचा ,

झेप घेतली आकाशी ...

आनंदीचे एकच ध्येय ,

विनाश अज्ञानाचा करायचा,

डॉक्टर होता स्वदेशी परतुन,

देशबांधवांना सेवा द्यायची ,

त्याच्यां प्रती आपले कर्तव्य बजावायची ...

नियतीचा क्रुर आघात,

क्षयाने शरीराला पोखरला ,

स्वप्न स्वप्नवतच राहीले,

हिंदूस्थानातील पहिली डॉक्टर ,

अनंतात विलीन होता ,

जगात अमर नाम राहीले ...

आनंदी गोपाळ वाचन मला सुचलेला कविता सार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational