थ्री इडियट्स
थ्री इडियट्स
कालच दहावीची परीक्षा दिली
अभ्यासाची कसोटी पूर्ण केली
आता म्हटलं जरासा करू या आराम
खेळ गाणि,पिक्चरचा करू या सरंजाम
तेवढ्यात आला कानी आईचा आवाज
विचारात होते बाबा भविष्याचे कामकाज
आई म्हणते,माझी लेक होईल डॉक्टर
बाबा म्हणतात, नाही! होणार ती कलेक्टर.
Science field ला जायचं commerce ला,
गोंधळ चालूच दोघांचं मी राहिले बाजूला.
"मला तरी विचारा "मी म्हटलं रागावून
दोघे म्हटले एकसाथ, तुला कळत नाही मनू
आता मात्र सगळेच झाले ठीक - ठाक
कारण,आजी - आजोबांनी दाखवला आहे धाक
आजी म्हणाली'three idiots'पाहिला नाही तू
लेकरांना तेच करू द्या जे आहे त्याच्या मनी
