जिजाऊ
जिजाऊ
1 min
177
उन्हाळा अन् पावसाळा
स्वराज्याचा गारवा.
जिजाऊंच्या जीवावर
न्हाई कोणाची परवा.
आम्ही जिजाऊंच्या मुली
जश्या तलवारीच्या आन्या.
होईल तुझीच रे शोभा
बोल दूरून शहाण्या.
आम्ही जिजाऊंच्या मुली...!
मिर्या परीस तिखट
बोल जपुन रे बाबा.
आब जाईल फुकट.
आम्ही जिजाऊंच्या मुली...!
जश्या तलवारीच्या धारा
न्हाई घेणार बघ दादा
कोण्या परायाचा वारा
उन्हाळा अन् पावसाळा
स्वराज्याचा गारवा
जिजाऊंच्या जीवावर
न्हाई कोणाची परवा....!
