थोडं जगून बघ
थोडं जगून बघ


दुःख असती आयुष्यात आपल्या
म्हणून सुखाची किंमत कळते आपल्याला
अडचणी तर येतात प्रत्येकाच्या आयुष्यात
म्हणून काय यश मिळवायचे नसते का?
पाप-पुण्य याच जन्मात भोगायचं असतं
म्हणूनच स्वर्गात जायची चढाओढ असते ना
चांगलं कर्म वाईट कर्म सगळ्यांचा तोल राखुनी म्हणून दिवसानंतर रात्र येतेच ना या धरतीवरती
या जन्मात तरी तिरस्कार नको करण्या कोणाचा म्हणून हा जन्म जगुनी घ्यावा आनंद तोलामोलाचा
नको विचार करू आता जगणे हे अनमोल असती अर्धे आयुष्य रडत गेलं उरलेलं आयुष्य हसत काढ जरा