थँक्स कोरोना (3)
थँक्स कोरोना (3)
आम्ही एक झालो
हिंदू मुस्लिम
आणि
सीख, इसाई
विसरुन सारे
भेद भाव.
आम्ही करत नाही
आता
सीमावाद
प्रांतवाद
आणि
भाषावादाची
चर्चा.
आम्ही विसरून गेलो
जाती धर्माची
भाषा
मंदिर मशिदीचा
वाद
आणि
आपासातले सगळे
मत भेद.
एकत्र आलोय
आम्ही सर्व
भारतीय म्हणून
या संकट समयी.
हे सगळं
तुझ्यामुळेच
शक्य झाला,
हे चमत्कार
तुझ्यामुळेच
घडलं
म्हणून
थँक्स कोरोना
