STORYMIRROR

Sunita Ghule

Fantasy

3  

Sunita Ghule

Fantasy

थंडगार वारा

थंडगार वारा

1 min
458


थंडगार वारा तनाला शहारा

सृष्टीतील जीव शोधती निवारा।


अदा निसर्गाची मोहवी शराबी

चित्त खुलवी गोड थंडी गुलाबी।


तन मन पुष्ट ऋतू हा बरवा

अग्नी प्रज्वलित वाढता गारवा।


प्रेमांकूरी फुले निसर्ग साजरा

उब स्नेहाची शेकोटीचा उबारा


पानगळी वृक्षा येते अवकळा

सैरभैर पर्ण वाऱ्याच्या ह्या झळा।


तरी मना भावे थंडगार वारा

फक्त नको वाऱ्यासवे थंड गारा।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy