हवा तसा विश्राम
हवा तसा विश्राम
वेळ मिळत नसतो काढावा लागतो, कितीही कामे करा तमाम
आपल्या लोकांसाठी वेळ थोडा, हवा तसा विश्राम
दिवस सरतो कामामध्ये, जसा रोजचाच तो हमाम
पोटासाठी चालवावी लागते, आयुष्यभर ही जबान
पेलून सारं बोझ, समतोल राखावी सारी कमान
आपल्या लोकांसाठी वेळ थोडा, हवा तसा विश्राम
कायदा कामासाठी अन आरामासाठी, काय तो एक समान
कारण आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, चालू आपले दुकान
त्यातून जन्म घेई, प्रत्येक ते नवं सपान
आपल्या लोकांसाठी वेळ थोडा, हवा तसा विश्राम
आयुष्य संपते आपल्या लोकांसाठी, तेव्हा बनते ते महान
सुखं घेण्या विकत, कष्ट ठेवावे लागतात गहाण
भूक सार्यांना मोठं व्हायची, त्यात कळत नाही तहान
आपल्या लोकांसाठी वेळ थोडा, हवा तसा विश्राम
वेळ गेलेला कळत नाही, जेव्हा करत असतो जीवाचं रान
बोलत आपण नसतो, बोलतं आपलं ते काम
कर्म असे करा की, कोणी विसरणार नाही नाम
आपल्या लोकांसाठी वेळ थोडा, हवा तसा विश्राम