आठवणीतला श्रावण
आठवणीतला श्रावण
श्रावण येतो
तुझ्या आठवणीने
हिरवळतो
रिमझिमतो
उन्हात पावसाळा
मी सुखावतो
इंन्द्रधनु तो
उधळण रंगाची
करुन जातो
कधी,कधी तो
एकचं क्षण मनी
मनभावतो
रुंजी घालतो
असाच मनावर
अन् छळतो
श्रावण जातो
उन्हसरींचा ऋतू
उदास होतो

