मी महाराष्ट्र बोलतोय
मी महाराष्ट्र बोलतोय
मी महाराष्ट्र बोलतोय
माफ करा हिंदी, इग्रजीची परवानगी घेवून थोडं
मराठीत बोलतोय
आज अनावर झालय म्हणून गरजतोय
....मी महाराष्ट्र बोलतोय
माझी मान उंचवणाऱ्या शहरांनी अगदी मराठी
भाषा सोडली आहे
अनेकांनी तर तिला फक्त
आपल्या घरा पुरतीच मर्यादित ठेवली आहे
घरातून बाहेर पडलं कि माझी माय मराठी
तिरस्काराने वेढली आहे
या जखमेवर रोज नवा जख्म मिळतोय
....मी महाराष्ट्र बोलतोय
ज्या राजानं स्वराज्याचा आदर्श दिला
त्यांची फक्त इथे जयंती आणि पुण्यतिथी
साजरी होते आणि बहूतेक चौकांमध्ये
त्यांच्या नावाने हिंदी गाणयांची मैफिल रमते
अरे या नाचगाण्यात माझ्या राजाचं राजपण हरवलय
म्हणूनच पुन्हा एकदा त्या रायगडाला जागवतोय
....मी महाराष्ट्र बोलतोय
मराठी भाषा दिना निमित्त
किती जण कुसुमाग्रजांची आठवण काढतात
फार, फार तर काही गावांमध्ये मोजक्या साहित्यिकांची संमेलन पार पडतात
आज अभिजात दर्जा मिळावा म्हणून मराठी माणूस लढतोय
खरं पाहिलंतर एकजुटीचा अगदी अभाव दिसतोय
हिच शोकांतिका मनात बाळगतोय
....मी महाराष्ट्र बोलतोय
मराठी शाळा बंद पडल्या तर मातृभाषेचा अंत होईल
आणि कोणी एका काळी मराठी भाषा होती असं
तुमच्या वाचनात येईल
हे वाचताना ज्याच्या डोळयातून पाणी येईल
त्याला विनंती आहे की त्याच्या लेखणीत मराठीभाषा नांदू दे
आणि तिचा अटकेपार झेंडा फडकू दे
त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहतोय
....मी महाराष्ट्र बोलतोय
मुंबई सारखी आर्थीक राजधानी असूनही
शेतकऱ्याची पहिली आत्महत्या ही व महाराष्ट्रात होते
आणि त्या पेक्षाही दुर्दैव अजूनही शेवटची
आत्महत्या ही महाराष्ट्रतचं मोजली जाते
अरं कुठं नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र
आज या सर्व प्रश्नांची मी उत्तरं मागतोय
....मी महाराष्ट्र बोलतोय
