सुगंधी सोहळा
सुगंधी सोहळा
लाजूनी केवडा
मनी दरवळे
बघा सुमनांचे
सुगंध सोहळे
चंपक आतुर
चमेली भेटाया
अबोली निघाली
जास्वंद शोधाया
गुलाब मोहक
सुगंधी मोगरा
जुईच्या स्वागता
फुलला धोतरा
निसर्ग किमया
असे आगळीच
लुटते कायम
माया वेगळीच
लुटता आनंद
कुसुम परिमळ
यात्रा जीवनाची
रहावी निर्मळ..
