गौरव मराठी भाषेचा
गौरव मराठी भाषेचा
मराठीला गौरविण्यासाठी
रंग खेळले शब्दांनी
रमुन गेले तयात सर्व
आली ही चारोळी
माझ्या महाराष्ट्राची बोली
पराक्रमाच्या कथा सांगती
महाराष्ट्र हा माझा
पोवाडे ही असती त्यात
शिवाजी अमुचा राजा
आनंद झाला रमुन गेले
कलाकारांची जोडी
कला गुणांना वाव मिळाला
मराठी नाटकातुनि
पुढे येऊनि शब्द साखळी
रंगली व्याकरणानी
म्हणी, सुविचार, परिचय मोठे
नटले पंचागानी
भाषेला गौरविण्यासाठी
आत्मकथा पुढे ही आली
कुसुमाग्रजांचा जन्मदिवस
निबंध सांगत गेली
आनंद हा मनामनातुनि
लावणी ची मौज ही भारी
विपुल मराठी लेखनात
गोष्ट नि सुंदर गाणी
जोडत जोडत जोडशब्द हे
काळासंगे आली
कमाल केली शब्दांनी ही
आत्मचरित्रे ही आली
शब्द रंगले साहित्याने
ललित साहित्यात सौंदर्य
नवा रंग हा खुलून दिसला
ग्रंथ आणि 'वेदा' त
रंगले शब्द रंगले चित्र
आंनद चारी बाजूंनी
प्रवास वर्णन करताना ही
भाषणे संपुन गेली
नमन करूनि मन हे भरूनि
शब्दफुले वाहिली
रंगीत झालेल्या शब्द फुलांची
गौरव गीते झाली . .
माझ्या महाराष्ट्राची बोली
माझ्या महाराष्ट्राची बोली
