STORYMIRROR

Manisha Wandhare

Fantasy

3  

Manisha Wandhare

Fantasy

शब्दगजरा...

शब्दगजरा...

1 min
160

शब्द सुमनांचा गजरा ,

माळला मनाने,

डवरलेल्या माझ्या भाषेतील,

किती सुमने वेचु कवितेने...

गुंफता एक गजरा,

सुगंध येते उरलेल्या शब्दांचा,

कोणता घेऊ गुंफाया,

इथे सडा सांडला शब्दांचा...

वाटते मला मी अपुरी पडते,

शब्दफुले माळायला,

तरी मोह आवरत नाही,

गजरा शब्दांचा करायला...

आवडेल का? तुम्हाला,

सुगंध माझ्या कवितेचा,

समिक्षा रूपी द्या ना,

साज चढवुनी माझ्या कवितेचा...

असा माळावा शब्दगजरा,

सुगंध दरवळावा मनात,

एक एक शब्दांना वेचुन,

गुंफत राहील गजरा शब्दवनात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy