आठवणीचा प्रवास भाग :२४
आठवणीचा प्रवास भाग :२४
कधी घडेल भेट आपली
ठाऊक नाही मला
कल्पनेत तर असच वाटतं
पाहत राहावं तुला...
काहीही न बोलता मी
सर्व कळावं तुला
नजरेतून मी बोलते
हे प्रत्यक्ष कळावं तुला...
असंच मनातील शब्दांना
तू डोळ्यांनी समजून घ्यावं
असंच तुला पाहताना मी
सर्व तुला कळावं
तुला पाहता पाहता
वेळ जावी ही निघून
शब्द तुझ्या
तोंडून निघावे
माझ्या डोळ्यातील
प्रेम बघून....

