STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Action

2  

Abasaheb Mhaske

Action

थांबव तुझं एरंडाचं गुऱ्हाळ

थांबव तुझं एरंडाचं गुऱ्हाळ

1 min
14.2K


सत्त्तेच गणित तुझं कुठवर सोडवतोस ...

निकाल हाती आला तरी अभ्यासच करतोस 

धरलं तर चावत, सोडलं कि पळत ...

आम्ही करतो दुर्लक्ष ,म्हणून त्यांचं फावतं .

समजतोस तेवढं हे सोप्प नसत राजकारण 

जनता सार जाणते कसं आवराव कोणतं जनावर

वेळ गेल्यावर कळून आता उपयोग नाही गड्या  

जाहिरातबाज धोरण तुझं थांबावं कि आता ....  

कुठवर काढतोस अश्वासणाचं वांझोट पीक 

तुझ्या दुकानात काहीच नसतं तरीही 

सुखी माणसाचा सदरा विकतो कसा ?

जनता जागा दाखवूं देतेच , थांब जरासा ...

पोर हे भलतंच बेरकी , आम्हालाच मूर्ख समजत 

बोलतं ते करीत नाही , करतं ते बोलत नाही ...

दाखवत ते लोकशाही , आतून -आतून ठोकशाही 

विकासाच्या गप्पा नुसत्या , ऐकावं ते कवतिक 

तेच दळण कुठवर दळतोस, स्वप्नातच कसे गुलगुले तळतोस  

जनता तेवढी भोळी नाही तू जेवढी समजतोस ...

बस्स झालं विकासाच्या गप्पा ,किती मारशील थापावर- थापा 

थांबव तुझं एरंडाचं गुऱ्हाळ आणि उचल आता तुझं बिऱ्हाड ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action