STORYMIRROR

Veena Chavan

Inspirational Others

4  

Veena Chavan

Inspirational Others

तगून राहणं गरजेचं आहे

तगून राहणं गरजेचं आहे

1 min
341

जिंकू किंवा मरू

म्हणून

खड्डयांनीं भरलेल्या

रस्त्यावर

गाडी घालायची

सवय करून घ्याच

जमेल तसं आणि तेव्हा

इच्छित स्थळी पोहचू

म्हणून टोकाचा संयम ठेवत

ट्रॅफिक जामची सवय

करून घ्या

चढायचचं आहे गर्दीत

पोहचायचं आहे

कामाच्या ठिकाणी

म्हणून जीवाची पर्वा

न करता गर्दीत

घुसायचीही 

सवय लावुन घ्या

राहायला निवारा तर हवा 

म्हणून आहे त्या पुंजीत

खुराड्यासारख्या घरात

जगण्याची

सवय करून घ्याच 

Survival of the fittest

हे म्हणे तगून राहणाऱ्या

जीवांसाठीचं 

एक सूत्र आहे

म्हणून तगून राहण्यासाठी

जीव 

धोक्यात घालणाऱ्या

सगळ्यां गोष्टींची

सवय करून घ्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational