तगमग
तगमग
कुठे शोधू दान देवा
तगमग होते या जीवाची
जिव झुरतो आहे फक्त
गरज आहे भाकरीची
थांबव हा खेळ सारा
राबू देत माझे हात
अर्थ नाही उरला
या पोकळ शब्दात
कष्टाची भाकरी मज
कमवू दे सुखाने
आनंंदानेे भरू दे
मज रिकामे रकाने
