तगमग
तगमग
क्षण क्षण गोठला उरी
भाव तो क्षितिजा परी
काहुर जे दाटले अंतरी
भार सोसावेना भरजरी
कण कण उरली नाती
बंध तो जपयला अंती
क्षणात स्वत:ला गुतंती
काळास च देई विश्रांती
भय कालचेच या नभी
वादळा तुझी काय गति
आभासिक ती एक छबी
मिटल्या नात्यात शोधती
सांजवेळी काहुर या मनी
काहुन तगमग जीवघेणी
कशास जीव कासावीस
सांगू कशी ही कहाणी