तेव्हा तुझी आठवण...
तेव्हा तुझी आठवण...
शब्दकळ्या कोमेजल्या
काळजात साठवण
सांजवेळ हुरहुरे
तेव्हा तुझी आठवण........१!!
क्षितिजाच्या पायथ्याशी
एकटीची हितगूज
काहुरल्या संवादाने
आर्वजून हाक तुज........२!!
अधीरता नजरेची
बेभानता काळजाची
संयमता क्षणोक्षणी
सत्व परिक्षा प्रेमाची...... .३!!
शांत वारा दमलेला
संगतीला माझ्या असे
सारे संदेश आभासी
दिल्यागत वाटतसे.......४!!
गंधाळली रातराणी
त्यात तुझीच प्रतिमा
गंधहिन जीवनाला
देऊ कशी मी लालिमा..........५!!
निरवता चहुबाजू
तेव्हा तुझी आठवण
कातरवेळेची व्यथा
शोधाशोधी वणवण..........६!!

