STORYMIRROR

Manisha Awekar

Classics

4  

Manisha Awekar

Classics

ते माझे प्रिय तात

ते माझे प्रिय तात

1 min
204

वडील चंद्र नभीचे

चांदणे माया प्रेमाचे    (1)


कष्ट अपार साहिले

परि मूकचि राहिले     (2)


हस्ताक्षर सुंदरची

जणू मोत्याचे दाणेची   (3)


वक्तशीर नेहमीच

सहकार्य सर्वांनाच     (4)


मोह , लालसा पैशाची

नसे तुम्हां ठाउकचि    (5)


असत्याचा तिटकारा

चढतसे क्रोध पारा    (6)


विनोद ,गप्पा , गोष्टींची 

रंगे मैफल सुट्टीची     (7)


पत्रलेखन छानची

वाचक मनी खूषची   (8)


घरी वा कचेरीमधे

काम व्यवस्थितपणे   (9)


भावनाप्रधान मनी

परदुःखे डोळा पाणी   (10)


अचानक देवाघरी

खंत मनीषाच्या उरी   (11)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics