STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

3  

Shila Ambhure

Tragedy

तडा

तडा

1 min
270


हसतं खेळतं

माझं घरकुल.

जणू बागेतलं

मोठे गेंदफुल.


घरटे हसरे

कोणा ना देखले.

वादाचे बीज ते

घरात फेकले.

    

संशयाचं भुत

मनात शिरलं.

दुःखाचं वादळ

घरात फिरलं.

     

घर अचानक

असं कोसळलं.

कोणालाच कसं

जरा न कळलं.


दुभंगली मने

नाती दुरावली.

लेकरांची मात्र

आबाळच झाली.


आई किंवा बाबा

जाऊ कुणाकडे.

कोवळ्या मनाला

प्रश्न हाच पडे.


एकाच घराची

झाली विभागणी.

रांगोळी न दिसे

आताशा अंगणी.


आली अवकळा

घरही रुसले.

पाहुनि दूर्दशा

पुन्हा ना हसले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy