तारू लागले बंदरी
तारू लागले बंदरी
1 min
7.2K
तारू लागले बंदरी ।
चंद्रभागेचिये तिरी ॥१॥
लुटा लुटा संतजन ।
अमुप हे रासी धन ॥२॥
जाला हरिनामाचा तारा ।
सीड लागले फरारा ॥३॥
तुका जवळी हमाल ।
भार चालवी विठ्ठल ॥४॥