STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

तांबडी जोगेश्वरी

तांबडी जोगेश्वरी

1 min
263

पुण्यनगरीत / माता जोगेश्वरी

श्रद्धा नित्य उरी / भक्तांचिया (1)


भावभोळे भक्त / नित्य विश्वासूनी

प्रार्थना करुनी / आळविती (2)


नवरात्र काळी / महिला लोटती

चूडे वस्त्र देती / भक्तीभावे (3)


अखंड सौभाग्य / आम्हां देई देवी/

सुखी सर्वां ठेवी / कृपा करी (4)


रक्षणकर्तीच / संकट निवारी/

येता ग्रामावरी / जोगेश्वरी (5)


मंगलकार्याचे / हर्षे निमंत्रण/

पहिलाच मान / देवतेचा (6)


ग्रामदेवता ही / सकलां सांभाळी/

माया प्रेम देई / जोगेश्वरी (7)


श्रद्धास्थान असे / सकल भक्तांचे

आशिर्वचनाचे / दान द्यावे (8)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract