STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

स्वयंप्रकाशित

स्वयंप्रकाशित

1 min
213

तुजसवं काहीतरी आहे

म्हणून तो तुझा आहे 

गहिऱ्या विचारांती बघ

तू फक्त एकटाच आहेस..


गुळाच्या ढेली झुंड माशांचा

आमदार, नामदारकडे 

घोळका माणसांचा

फुलपाखरे करिती

द्रव्य शोषण पुष्पांचा

काही नसला की रं

करिती त्याग तयाचा..


तुला वाटतं की

तुझे सर्वच असतं

संकटकाली बघ

मदतीला कोणी येतं?


ही नातीगोती आपुलकी

तुमच्या वैभवापुरते रं

दारिद्र्याचे कोणी नाही

मात्र तुम्ही एकटे रं..


म्हणून एकच ध्येय

सुजाण माणसा ...!

कर्तृत्ववान असावं

यशाचा सूर्य उगवतोच

स्वयंप्रकाशित राहावं

तेजाने सन्मान येतो..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational