सवय
सवय
सवय वाचनाची
वाचक घडताे,
अधिक वाचनाने
पारंगत हाेताे...
सवय लिखाणाची
लेखक घडताे,
अधिक लिखाणाने
शास्त्रशुद्ध बनताे...
सवय वकृत्वाची
यथाेचित बाेलताे,
अधिक भाषणाने
अष्टपैलू बनताे...
सवय चिंतनाची
मनन हाेत राहते,
चांगल्या सवयीने
व्यक्तीमत्व घडते...
