Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract

4.6  

Sarika Jinturkar

Abstract

सवय

सवय

1 min
349


सवयी बऱ्याच असतात  

काही चांगल्या काही वाईट परंतु चांगल्या सवयी नेहमी अंगीकाराव्या असो परिस्थिती कितीही बिकट वा नीट  


सवय असावी 

आयुष्यातील सुखदुःखाचे क्षण

ह्रदयाच्या कप्पात साठवून ठेवण्याची आणि त्या आठवणींना आपलंसं करून जगण्याची  


सवय असावी 

येणाऱ्या प्रत्येक क्षणांना हसत सामोरे जाण्याची आयुष्याचा प्रत्येक खेळ सामंजस्याने खेळण्याची


 सवय असावी 

मनाच्या भिंतीला कुठेतरी अलगत सावरण्याची 

मोडले असता कितीदा तरी पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची


सवय असावी  

कधीतरी गर्दीविना एकांतात रमण्याची 

समोरच्यांच्या दुःखावर कधीतरी हळूवार फुंकर मारून नात्यातील ऋणानुबंध अलगदपणे जपण्याची  


सवय असावी 

स्वप्नांच्या जगात हरवतांना 

कधीतरी स्वतःला सावरून बघण्याची 

मनातल्या अबोल भावनांना कधीतरी शब्दात मांडायची  


सवय असावी 

सुखाचे क्षण अनुभवताना कधी 

दुःखाचे ओझे वाहून बघण्याची 

प्रेमाची अपेक्षा कुणाकडून ठेवतांना 

कधी दुसऱ्यांनाही प्रेम वाटून बघायची  


सवय असावी

कधीतरी हक्काने हाक देण्याची 

निसटल्या शब्दांना, 

तुटलेल्या मनांना,

दुरावलेल्या नात्याला, 

हरवलेल्या प्रेमाला  

नव्याने पुन्हा रेशीम बंधात जोडण्याची 


परंतु ...

अट्टाहास करू नये असा की 

ज्याची सवय होऊन जावी 

त्यातून बाहेर पडण्यासाठी मग सारी ऊर्जा नष्ट व्हावी 


बेधुंद व्हावे असेही एकदा की स्वप्नांची या पाखरे व्हावी 

मुक्त जगावे असेही एकदा की

जीवनाला ह्या आपलीच सवय होऊन जावी...🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract