सवत माझी द्वाडाची
सवत माझी द्वाडाची
जेव्हा ती असते त्यांच्या सोबत,
तेव्हा मी नाही त्यांना आठवत.
तिचाच विचार मनात अनेकदा,
विरून जातात तिच्यात कित्येकदा.
उगीच वाहते मी शिव्यांची लाखोली,
उमगत नाही त्यांच्या मनाची खोली.
तीच यांच्या जीवाभावाची खरी,
सुख दुःखातही होई वाटेकरी.
आवड यांना असे या कवितेची,
ती तर असे सवत माझी द्वाडाची.
