Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chaitali Warghat

Inspirational

4  

Chaitali Warghat

Inspirational

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ

1 min
4


मराठी राज्याचे संस्थापक...

छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ 

मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा पाया तिनेच घातला,

ऐतिहासिक सत्य आहे, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


छत्रपती शिवाजींच्या शुद्ध चरित्रांची

जडणघडण घडविणारी जिजाऊ 

हिंदवी स्वराज्य बनविण्यास,

सिंहाचा् वाटा असलेली, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


तलवार चालविणे, भालाफेक

घोडेस्वारी करणारी जिजाऊ 

रयतेचे संरक्षण कसे करावे, 

शिवबाला शिकवणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


सत्य, शाश्वत, नियमित..

धर्मपालनाचे धडे देणारी जिजाऊ 

मन वात्सल्यमय, करुणामय,

इतरांसाठी झीजणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


हिंदवी स्वराज्याची स्थापना

हेच धैर्य बाळगणारी जिजाऊ 

समाजाला जागृत करून,

ज्ञानसंपन्न करणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


आपल्या प्रभावी वाणीने...

प्रेतातही प्राण ओतणारी जिजाऊ 

मावळ्यात चैतन्याचा प्रभाव,

आधाराचा हात देणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


रांधा, वाडा, उष्टी काढा

यापेक्षा थोर आदर्श देणारी जिजाऊ 

दिव्यत्वाचे, बाळ संगोपन,

स्त्री मुक्त असावी सांगणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


प्रचंड प्रेम, जन्मजात जिव्हाळा

रयतेचा सांभाळ, प्रेरणा देणारी जिजाऊ 

माता म्हणून मुलावर जीव ओतणारी

जिवापाड काळजी घेणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


डावपेच, गनिमी कावा, तर्क

बिन भिंतीच्या शाळेत शिकवणारी जिजाऊ 

कर्तृत्वशक्ती, सहनशीलता

धडपडणार नेतृत्व होती, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ....


भूतकालीन, भविष्यकालीन...

अद्वितीय पुत्राला जन्म देणारी जिजाऊ 

शिस्तीखाली संघर्षमय, सतचरित्र

छत्रपती भारताला देणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ...


अपत्य धारणा, अपत्य संगोपन

नेतृत्वाच उत्तम आदर्श जिजाऊ 

बलवान शूरवीर छत्रपती ही बनविता येतो

हेच दाखवून देणारी, स्वराज्य जननी

राजमाता जिजाऊ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational