STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

4  

Rohit Khamkar

Inspirational

स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती

1 min
801

पाहिली खूप अजूनही पाहतोय, आता तयारी पुर्ण करायची

स्वप्न सत्यात उतरतील, वेळ आता मेहनत पेरायची


प्रयत्नाला साथ मेहनतीची, नवी उमेद आणि जिद्दीची

सगळी संकटे पार करेल, साथ भेटेल जेव्हा बुद्धीची


थोडासा वेळ लागेल कधीकधी, मोठा पल्ला गाठण्यासाठी

स्वप्नपूर्तीची मजाच वेगळी, आभिमान वाटण्यासाठी


हिरमोड होईल अपयशही मिळेल, प्रयत्न सारा करताना

किंमत नक्कीच कळेल मनाला, प्रत्येक क्षण झुरताना


आयुष्य जगताना, नित्य भूतकाळाची आठवण राहावी

उज्ज्वल भविष्य करण्या, रोज नवनवी स्वप्न पाहावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational